‘प्रत्येक भक्ताचा एक वृक्ष’ अभियानात पालकमंत्री उदय सामंत सहभागी; नाणीज येथे केले वृक्षारोपण

रत्नागिरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे आयोजित ‘प्रत्येक भक्ताचा एक वृक्ष’ या उपक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले.

यावेळी पर्यावरणाचे संरक्षण आणि हरित संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, संस्थानचे पदाधिकारी, भाविक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली आणि निसर्ग संरक्षणासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button