’केन्द्रीय सागरी संशोधन संस्थेकडून’ मत्स्यपालन ’डीप डेटा’ हे विशेष मोबाईल ऍप विकसित


खोल समुद्रातील मत्स्यसंपदा आणि दुर्मिळ माशांची वैज्ञानिक माहिती संकलित करण्यासाठी ’केन्द्रीय सागरी संशोधन संस्थेने’ मत्स्यपालन ’डीप डेटा’ हे विशेष मोबाईल ऍप विकसित केले आहे. केंद्राच्या डीप ओशन मिशन’ अंतर्गत तयार करण्यात आलेले हे ऍप कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या मच्छीमारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अथांग समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात अनेकदा दुर्मिळ किंवा एरवी सहसा न दिसणारे मासे सापडतात. अशा माशांची योग्य ओळख पटवणे किंवा त्यांची नोंद ठेवणे स्थानिक पातळीवर शक्य होत नाही. मात्र, या नव्या ऍ पमुळे मच्छीमार समुद्रात सापडलेल्या अशा माशांचे फोटो तत्काळ अपलोड करू शकणार आहेत. मच्छीमारांनी पाठवलेल्या फोटोंची आणि माहितीची आधी सागरी सीएमएफआरआय’च्या शास्त्रज्ञांकडून पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच ती राष्ट्रीय डेटाबेसमध्ये जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button