
राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाचा आराखडा तयार करावा, ऍड. आशिष शेलार
राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर यंदाचा उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारीला लागावे. तसेच सर्व शासकीय विभागांच्या जबाबदार्या निश्चित करून विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा आणि त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) पुढील १० ते १२ दिवसांत अंतिम करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिले.




