PM मोदींनी मध्यरात्री शेअर केलेल्या व्हिडिओची अभिजीत दिपकेंनी उडवली खिल्ली; ‘ते’ मिम शेअर करत डिवचलं!

Jantar Mantar protest : जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस देशभरात वाढत असल्याने अखेर सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.

मात्र, सरकारने आता पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं सांगितलं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यरात्री एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी “उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार आहेत.” असं लिहिलं आहे.

तर दुसरीकडे मोदींच्या याच व्हिडिओची कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी खिल्ली उडवली आहे. दीपके यांनी एक्सवर एक मिम शेअर केलं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या घराबाहेर असलेल्या गेटला कुलूप लावताना दिसत आहे. मात्र, तो ज्या गेटला कुलूप लावतोय. ते छोटं असून त्याच्या बाजूने कोणीही व्यक्ती त्या गेटशिवायही घरात घुसू शकतो, असं मिममधून दाखवण्यात आलं आहे.

मोदींचा व्हिडिओ रिपोस्ट करत, ‘कठोर कारवाई’ असं कॅप्शन देत दीपके यांनी हा फोटो शेअर केला. त्यामुळे एकप्रकारे सरकारची कठोर कारवाई या व्यक्तीने गेटला कुलूप लावल्याप्रमाणे आहे, असा मेसेज दीपके यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर गुरूवारी आपलं उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपलं उपोषण सोडण्यांचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती वांगचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत दिली.

या व्हिडिओत, “मी 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती. ‘विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला,” असं वांगचुक यांनी म्हटलं आहे. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं तरीही कॉकरोच जनता पार्टी आपल्या आंदोलनावर ठाम असून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button