
मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
NEET पेपर लीक आंदोलनादरम्यान 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण अखेर संपलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं.विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीकबाबत मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
मोदींच्या व्हिडिओनंतर काही मिनिटांतच निर्णय
या घडामोडीतील सर्वात महत्त्वाचा योगायोग म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर कायद्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवत असल्याची घोषणा केली. या दोन घटनांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा
वांगचूक यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दिला होता.सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर पाहा काय म्हटलं
“आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच लेह-लडाखच्या एपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले.
यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्राद्वारे मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.
विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या चर्चेदरम्यान ठरलेल्या अटींबाबत मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती देणार आहे.
तोपर्यंत माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, देशात कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ देऊ नका. सर्वांनी सतर्क राहा आणि शांतता कायम राखा.”



