आज महाराष्ट्र बंदची हाक!


दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांविरोधात तसेच नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याने आंदोलनाला वेगळं वळणं मिळालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज (२३ जुलै) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २१ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. त्यांनी भाजपविरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर २२ जुलै रोजी राजभवनाबाहेर झालेल्या आंदोलनात युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button