
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे समुद्रकिन्मयावर मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन समुद्री कासवांना जीवदान
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे समुद्रकिन्मयावर मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन दुर्मिळ समुद्री कासवांना स्थानिक तरुणांनी वेळेवर मदत करत जीवदान दिले. तरुणांच्या सतर्कतेमुळे या कासवांची सुरक्षित सुटका करण्यांत आली असून, त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे या घटनेमुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे ही दोन्ही कासवे किनार्यालगतच्या भागात वाहून आली होती. समुद्राच्या तीव्र लाटांमुळे त्यांची हालचाल मर्यादित झाली असल्याचे काही स्थानिक तरुणांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कासवांना सुरक्षितपणे किनार्याच्या बाजूला आणले. त्यानंतर त्यांच्या पायांमध्ये घट्ट अडकलेले जाळे काळजीपूर्वक कापून त्यांची सुटका करण्यात आली. जाळ्यातून पूर्णपणे मुक्त केल्यानंतर दोन्ही कासवांची प्रकृती स्थिर असल्याची खात्री करण्यात आली. या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान कासवांना कोणतीही इजा होणार नाही, याची विशेष दक्षता तरुणांनी घेतली होती. प्रकृतीची खात्री पटल्यानंतर दोन्ही कासवांना पुन्हा समुद्राच्या अथांग स्वाधीन करण्यात आले.




