
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेणार
राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानात गेल्या दोन दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली तरुणांनी पुकारलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत चालले आहे.आंदोलक तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, आता विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत तरुणांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः उद्या जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याने राजधानीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
काल सोमवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी अमानुष लाठीमार करून आंदोलकांना जंतरमंतरवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु या लाठीमारामुळे तरुण अधिकच चिडले आणि रात्रीच्या वेळी त्यांनी पुन्हा एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.




