नीट’चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश


पेपरफुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री लागला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला.३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपर फुटीच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच शिफ्टमध्ये ही फेरपरीक्षा दिली होती.

ज्या उमेदवारांनी या प्रवेश परीक्षेसाठी हजेरी लावली होती, ते आता अधिकृत NEET वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत ७२० पैकी ७१५ गुणांचा सर्वोच्च स्कोअर पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पानशुल बन्सल यांनी संयुक्तपणे मिळवला आहे.

भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे पहिले १७ टॉप रँकर्स हे प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू आणि तेलंगणा अशा आठ राज्यांमधील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button