मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डे येथील ‘वालावलकर रुग्णालयात’ २१ व २२ जुलै रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर


​रत्नागिरी, दि. १६ ): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै २०२६ रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील गरजू बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी)’, ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ आणि ‘बीकेएल वालावलकर रुग्णालय (सावर्डे)’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २१ व बुधवार २२ जुलै २०२६ रोजी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बीकेएल वालावलकर रुग्णालयात करण्यात आले आहे.
​मुंबईचे प्रख्यात सर्जन डॉ. पारस कोठारी करणार शस्त्रक्रिया
​या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुंबई येथील प्रसिद्ध, अनुभवी आणि प्रख्यात बालशल्यचिकित्सक (पीडियाट्रिक सर्जन) डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पाडल्या जाणार आहेत.
​खालील आजारांवर केल्या जाणार मोफत शस्त्रक्रिया:
​शिबिरादरम्यान बालकांच्या खालील प्रकारच्या गुंतागुंतीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातील:
​लहान मुलांच्या पोटाचे आजार व पोटावरील शस्त्रक्रिया.
​जन्मतः असलेले विविध आजार व नवजात बालकांच्या शस्त्रक्रिया.
​लघवीचा त्रास आणि त्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया.
​शरीरावरील गाठी व सूज काढण्याच्या शस्त्रक्रिया.
​अपेंडिक्स आणि हर्निया यावरील शस्त्रक्रिया.
​नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्रे:
​या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्ण बालक आणि त्यांच्या पालकांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
१. रेशन कार्ड
२. ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड)
​त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन:
सदर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजू पालकांनी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नाव नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत यांनी केले आहे.
📞 संपर्क क्रमांक: ८८४७७९०१४९, ९२७२८९७८३४, ९९२२५६६६३९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button