
राजकारण वेगळं, वैयक्तिक आयुष्य वेगळं, पालकमंत्री ना. उदय सामंत
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि अयोध्या पोळ यांच्याशी संबंधित चर्चेत असलेल्या प्रकरणावर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी संयमी भूमिका घेत, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचे राजकीय भांडवल करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. सामंत म्हणाले की, हा विषय पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी निगडित आहे. या प्रकरणात
संबंधितांनी आपापली भूमिका मांडली असून, सध्या हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे त्यावर राजकीय टिप्पणी करणे किंवा त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही. ’माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे एखाद्याच्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक विषयाचे राजकारण करण्याची माझी वृत्ती नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी वैयक्तिक बाबींवरून आरोप-प्रत्यारोप करण्याच्या राजकारणापासून दूर राहाण्याची भूमिका मांडली.




