रत्नागिरीत रंगणार स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचा कलात्मक अविष्कार


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ’क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य व नाट्यमय कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १५ जुलै रोजी | सायंकाळी ६.३० वाजता मराठा भवन हॉल, जिल्हा परिषदेजवळ, माळनाका, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतिकारी विचार, साहित्यनिर्मिती आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभावी कलात्मक आविष्कार रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे लेखन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे असून निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. सोनम जाधव व सहकारी, मुग्धा गावकर (गोवा), राम तांबे मीरा खालगावकर-जोशी व सहकारी यांच्यासह अनेक गुणी कलाकार संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारतील. चैतन्य पटवर्धन (ऑर्गन) आणि केदार लिंगायत (तबला) यांची साथसंगत कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, अंदमानातील सेल्युलर कारागृहातील संघर्ष, रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य, साहित्यसंपदा आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button