
ता. राजापूर येथील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामांना मंजुरी; आमदार किरण भैय्या सामंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश!
राजापूर:
राजापूर तालुक्यातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्ते व पुलांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार किरण सामंत (भैय्या) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले आहे. तालुक्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या पुलांच्या मंजुरीचे आदेश प्राप्त झाले असून, यासाठी एकूण ३.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन कामांना मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार किरण सामंत यांनी सातत्याने शासनाकडे या कामांचा पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणारे हे पूल दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात.
मंजूर झालेल्या कामांचा सविस्तर तपशील:
- अर्जुना नदीवरील नवीन पूल (निधी: २.५१ कोटी रुपये):
अर्जुना नदीवर (MDR-45) तळवडे बौद्धवाडी ते इंजिनवाडी रस्ता साखळी क्रमांक ५/७०० येथे नवीन पुलाचे बांधकाम करणे. या पुलासाठी २.५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. - ओणी तोरणवाडी ते चिखलगाव बौद्धवाडी रस्त्यावरील पूल (निधी: १.०४ कोटी रुपये):
ओणी तोरणवाडी बौद्धवाडी ते चिखलगाव बौद्धवाडी रस्त्यावरील साखळी क्रमांक १/२०० येथे पुलाचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी १.०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांकडून आभार:
या दोन्ही महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामामुळे राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास आणि प्रामुख्याने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमची मात करण्यास मोठी मदत होणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिलेले आमदार किरण भैय्या सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच या कामांना मंजुरी मिळाली असून, स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. या दोन्ही पुलांचे काम लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे समजते.




