
पेन्शनकार्डबाबत महिती देण्याच्या बहाण्याने अज्ञाता कडून वृध्दाची तब्बल 1 लाख 69 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
पेन्शनकार्डबाबत महिती देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने वृध्दाचे तब्बल 1 लाख 69 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना गुरुवार 9 जुलै 2026 रोजी दुपारी 2.30 ते 3 वा.कालावधीत शहरातील टिळक आळी परिसरात घडली आहे.याबाबत कौस्तुभ श्रीनिवास गोरे (43, रा.टिळक आळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल आहे. त्यानुसार, कौस्तुभ गोरे यांचे वडील घरी असताना अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करुन पेन्शनकार्ड बाबत माहिती दिली. त्यानंतर अज्ञाताने त्यांच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याआधारे मोबाईलचा ॲक्सेस घेउन फिर्यादीच्या वडिलांच्या सेव्हिंग व पेन्शन खात्यातून 1 लाख 68 हजार 500 रुपये काढून फसवणूक केली. फिर्यादीचे वडिल 83 वर्षांचे वयस्कर असल्याने फिर्यादीने सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात येउन तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा करण्यात आला आहे




