
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम 2026डिजीटायझेशन 100 टक्के पूर्ण केलेल्या बीएलओंचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कारराज्यात 263-दापोली मतदार संघ सहाव्या क्रमांकावर तर 265-चिपळूण नवव्या क्रमांकावर
रत्नागिरी, दि. 10 ) : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम 2026 च्या अनुषंगाने जिल्ह्यामधील Enumeration Form चे Digitization 100% पूर्ण केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशस्तीपत्र देवून आज गौरविले. या कामकाजात राज्यात पहिल्या 30 क्रमांकात जिल्ह्यातील 4 मतदार संघांचा आजअखेर समावेश असून, 263-दापोली मतदार संघ हे सहाव्या क्रमांकावर, 265- चिपळूण नवव्या क्रमांकावर, 264 –गुहागर 19 व्या क्रमांकावर तर 267- राजापूर 27 व्या क्रमांकावर आहे.
265 चिपळूण विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 311 -कोंडभुजबलच्या बीएलओ आरती अमित घस्ते, 265 चिपळूण विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक ११०-टेरव (बु) च्या बीएलओ सुप्रिया किसन लोखंडे व त्यांची सहाय्यक अंगणवाडी ताई मधुरा विश्वनाथ साळवी, 266-रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 43-खालगावचे बीएलओ चेतन कुंडलिक मेहेर व त्यांचे पर्यवेक्षक सीमा धुळप यांनी 100 टक्के डिझीटायझेशनचे काम पूर्ण केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी प्रशस्तीपत्रक देऊन आज या सर्वांचा सत्कार केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव बु.’ या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १००% पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. त्याचबरोबर राज्यातील पहिल्या 30 क्रमांकात जिल्ह्यातील 4 मतदार संघाचा समावेश झाला आहे.




