मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाहणी

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आज (९ जुलै) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस (ता. संगमेश्वर) येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची माहिती घेण्यात आली. तसेच बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग मधील आरोग्य सेवांचे कामकाज, उपलब्ध औषधसाठ्याची तपासणी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.
याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ, आरोग्य सेवा व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
यावेळी डॉ. लिंगायत, डॉ. आगरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज, रुग्णसेवा व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त करून पुढील काळातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button