आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात गणेशगुळे आणि कातळशिल्पांचा पर्यटन प्रवास


आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पर्यटनावर आधारित ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजता श्रोत्यांना गणेशगुळे आणि रत्नागिरीतील जागतिक महत्त्व लाभलेल्या कातळशिल्पांचा माहितीपूर्ण प्रवास अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमात पावसजवळील निसर्गरम्य गणेशगुळे गावाचा समुद्रकिनारा, स्वयंभू गणपती मंदिर, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची वैशिष्ट्ये तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध बाबींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्पांचा इतिहास, त्यांचे पुरातत्त्वीय महत्त्व, जागतिक स्तरावर त्यांची झालेली दखल आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पर्यटन अभ्यासक श्रीवल्लभ साठे आणि कातळशिल्प अभ्यासक आनंद मराठे यांनी मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफ.एम. १०१.५ मेगाहर्ट्झ, न्यूजऑनएअर मोबाईल ॲप तसेच आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकृत डिजिटल माध्यमांवरही ऐकता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button