
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर
*रत्नागिरी, दि. ६ : राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ वाजता गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोलीम गोवा येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा. दुपारी सोईनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. रात्रौ ११.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०११२) मुंबई कडे प्रयाण.




