
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोक्याची ठिकाणे आता थेट ’गुगल मॅप’वर !
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ’ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ Welcome to Ratnagiri या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी थेट गुगल कंपनीशी समन्वय साधत अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून आता वाहनचालकांना गुगल मॅपवरून महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे रिअल-टाईम ऍलर्ट मिळणार आहेत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केला आहे.
या उपक्रमानुसार, वाहनचालक रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच त्यांच्या गुगल मॅपवर थशश्रलेाश ींे ठरींपरसळीळ असा संदेश दिसणार आहे. त्यानंतर प्रवासादरम्यान पुढे असलेले धोकादायक घाट, तीव्र वळणे, शाळा, मानवी वस्ती, अंडरपास तसेच अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती आगाऊ ऍलर्टद्वारे चालकाला मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे आणि संभाव्य धोका ओळखून सावधपणे वाहन चालविणे अधिक सुलभ होणार आहे.
महामार्गावरील ज्या भागात वारंवार अपघात घडत होते, अशा एक ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील दहा महत्त्वाचे ब्लॅक स्पॉट पोलिसांनी निश्चित केले आहेत. यामध्ये भोस्ते घाट, हातखंबा, निवळी, लांजा आदी भागांचा समावेश आहे.www.konkantoday.com




