
जगबुडी नदीपात्रातून १८ हजार ब्रास गाळउपसा, पुराची टांगती तलवार दूर होणार
गेल्या दोन वर्षात खेड तालुक्यातील जगबुडी नदीपात्रातून आतापर्यंत ५३,०१४ म्हणजेच १८,६४९ ब्रास गाळ उपसण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत उपसलेल्या गाळाची डंपरद्वारे वाहतूक करण्यात येत आहे. पावसाळ्यात गाळउपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. आतापर्यंत उपसण्यात आलेल्या गाळामुळे यंदा बाजारपेठेतील पुराची टांगती तलवार दूर होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी पावणेतीन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर दोन वर्षापूर्वी गाळ उपसण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यादरम्यान, ६ महिने गाळ उपसण्याची प्रक्रिया रखडली होती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर पुन्हा गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला.www.konkantoday.com




