पावस विभागात काजू रोपे वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 20 शेतकऱ्यांचे फॉर्म भरले

जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या पुढाकाराने पावस व परिसरातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या काजू लागवड योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

शासनाच्या काजू लागवड योजनेअंतर्गत रोपे वाटपासंदर्भात ॲड. मांडवकर यांनी नुकतेच पावस व परिसरातील ग्रामस्थांना आवाहन केले होते. पावस विभागातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरणे अडचणीचे होते. ही अडचण लक्षात घेऊन सदर उपक्रम शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण उर्फ बाय शिंदे यांच्या कार्यालय, पावस येथे आयोजित करण्यात आला.

या आवाहनाला प्रतिसाद देत आज रविवार, दि. 21/06/2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत काजू रोपे मिळणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडली.

यावेळी कृषी सहाय्यक श्री. राऊत साहेब यांनी सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहून 20 शेतकरी बांधवांचे फॉर्म अत्यंत शिस्तबद्धपणे भरून घेतले. त्यांनी शेतकऱ्यांना काजू लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शनही केले. पावस विभागात मोबाईल रेंज नसल्याने उद्भवणारी अडचण लक्षात घेऊन श्री. प्रवीण शिंदे यांनी कार्यालय उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले व नियोजनात मदत केली.

ॲड. महेंद्र मांडवकर यांनी सांगितले की, “कोकणच्या हवामानासाठी काजू हे दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक आहे. शासनाची ही योजना शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. नेटवर्कच्या अडचणीमुळे शेतकरी वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम कार्यालयात घेतला. आज 20 शेतकऱ्यांचे फॉर्म भरले गेले, ही समाधानाची बाब आहे.”

फॉर्म भरणे सुरू राहणार
ज्या शेतकरी बांधवांना आज उपस्थित राहता आले नाही किंवा ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत, त्यांच्यासाठी संधी उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी दि. 30 जून 2026 पर्यंत कृषी सहाय्यक श्री. राऊत साहेब किंवा ॲड. महेंद्र मांडवकर, मो. 9423292575 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, आधारला लिंक मोबाईल नंबर, शेतकरी ओळखपत्र/Farmer ID, 7/12 उतारा.

या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे व सहकार्य करणाऱ्या प्रवीण शिंदे व राऊत साहेब यांचे ॲड. मांडवकर यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button