
कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील ३४ माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली असून, कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील ३४ माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ऐन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय अमलात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाच्या निकषांनुसार कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार बंद करण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, शिक्षकांचे समायोजनही पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांना दि. १ जुलैपासून नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.www.konkantoday.com




