मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज व नूतनीकरण प्रक्रिया सुरू; १००% नोंदणीचे आवाहन


*​रत्नागिरी, दि. १९ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे नवीन अर्ज स्वीकारणे आणि मागील वर्षातील विद्यार्थ्यांच्या अर्जांचे नूतनीकरण (Renewal) करण्याची प्रक्रिया ‘महा डीबीटी’ (MahaDBT) पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. महाआयटीद्वारे विकसित ‘महाशिष्यवृत्ती एकात्मिक संगणकीय प्रणाली’ द्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीचा एकही पात्र विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळांनी १०० टक्के ऑनलाईन अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन समाजकल्याण समिती सभापती ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांनी केले आहे.
​💻 मुख्यध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
​नोंदणी झालेल्या सर्व शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महा डीबीटी पोर्टलवरच भरायचे आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ‘युडायस प्लस’ (UDISE+) किंवा ‘सरल’ प्रणालीवर नोंद असलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. या प्रक्रियेत शाळांना मार्गदर्शन व देखरेख ठेवण्याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही (BEO) आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
​📋 ‘या’ प्रमुख योजनांचा समावेश
​मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीअंतर्गत प्रामुख्याने खालील योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे:
​सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती: इयत्ता ५ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या मुलींसाठी.
​भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (अस्वच्छ व्यवसाय): अस्वच्छ व्यवसायात कार्यरत असलेल्या पालकांच्या मुलांसाठी.
​भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (९ वी व १० वी): इयत्ता ९ वी आणि १० वी मधील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी.
​गुणवत्ता शिष्यवृत्ती: माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी.
​महर्षी विठ्ठल रामजी शिंदे योजना: मॅट्रीकपूर्व शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने (अनुसूचित जाती).
​महत्त्वाची नोंद: सर्व पात्र विद्यार्थ्यांचे पालक आणि मुख्याध्यापकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल.
​०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button