कलंबनी -थोरेवाडीत ७६ वर्षीय वृद्धाची आत्महत्या

खेड : करवणी-थोरेवाडी (ता. खेड) येथे आजारपणाला व आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका ७६ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या घटनेत भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६, रा. कलंबनी, थोरेवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी ही घटना घडली.
भागोजी घाणेकर यांनी आजारपण तसेच आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक नोंदीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेची नोंद करून पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button