जालगावात मुलाचा जन्मदात्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

दापोली : वार्ताहर

दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवर कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. सुनील आग्रे (४०) याने वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने, तर आई अनिता आग्रे यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button