कोकण दर्शनमध्ये धार्मिक, साहित्यिक आणि जलक्रीडांचा सफरनामा

रत्नागिरी – पर्यटन विषयक कार्यक्रम कोकण दर्शन मध्ये यावेळी धार्मिक साहित्यिक आणि जलक्रीडांचा सफरनामा उलगडणार आहे. 19 जून रोजी सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
आकाशवाणी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देणारा पर्यटन विषयक कार्यक्रम कोकण दर्शन हा दर शुक्रवारी प्रसारित होत असतो. यावेळी 19 जून रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात गणपतीपुळ्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक, श्रीकऱ्हाटेश्वर मंदिर पर्यटकांना वेड लावणारा आरेवारे इथला समुद्रकिनारा, नेवरे येथील स्कुबा डायव्हिंग आणि जलक्रीडा माहिती या कार्यक्रमातून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. या भागामध्ये हर्षदा भिडे, अमेय धोपटकर आणि मिलिंद मिरकर यांचा सहभाग आहे. पर्यटनाच्या माध्यमातून येथे वाढलेला रोजगार, गाव पातळीवर निर्माण होणाऱ्या सोयीसुविधा, धार्मिक वारसा जतन करताना इथल्या साहित्यिक परंपरेविषयी कार्यक्रमात सहभागी झालेल्या या व्यक्तींकडून श्रोत्यांना माहिती मिळणार आहे.
कोकण दर्शन या कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केलं असून कार्यक्रमाचे निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांच आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत. मध्यम लहरी अकराशे त्रेचाळीस किलोहर्टझ, एफ. एम. 101.5 Mhz, newsonair या लाईव्ह मोबाईल अँपवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ऐकता येईल. प्रसारानंतर हा कार्यक्रम एआयआर रत्नागिरी या youtube ऐकू शकतील. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाचे अंतरंग उघडणारा हा कार्यक्रम सर्व श्रोत्यांनी अवश्य ऐकावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button