रत्नागिरीत १५ ते २१ जूनदरम्यान भव्य मोफत योग शिबिराचे आयोजन


रत्नागिरी : दत्तगुरूंच्या पावन सान्निध्यात मन, शरीर आणि आत्म्याचे आरोग्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने किल्ला तळेकर वाडी येथे १५ ते २१ जून २०२६ या कालावधीत भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
योगाच्या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, कंबरदुखी तसेच तणाव यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याबरोबरच एकाग्रता, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढविण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरासाठी मार्गदर्शन तन्मय शशिकांत जाधव हे करणार आहेत. मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी इच्छुकांनी व्हॉट्सॲप क्रमांक ८३७९०१२३४७ वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button