
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; देवरुख पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी, दि. १५ ): संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील रहिवासी असलेले रविंद्र रामचंद्र कांबळे (वय ४८ वर्षे) हे गेल्या २३ मे पासून बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने देवरुख पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रविंद्र रामचंद्र कांबळे (रा. माळवाशी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे २३ मे २०२६ रोजी दुपारी १.३१ वाजण्याच्या सुमारास मौजे माळवाशी फाटा येथून अचानक नापत्ता झाले आहेत.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
उंची: ५ फूट २ इंच
रंग: गोरा
बांधा: सडपातळ
चेहरा व नाक: चेहरा गोल, नाक सरळ
केस: बारीक आणि सरळ
पोशाख: अंगात पांढऱ्या (सफेद) रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट
भाषा: मराठी
सवयी/व्यसन: तंबाखू खाणे आणि दारू पिणे
सदर वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ देवरुख पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.




