खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अडीच लाख रुपये किमतीची वजनमापे चोरणारा गजाआड


खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून २ लाख ४५ हजार रुपये किंमतीची वजनमापे चोरणार्‍या संजय सितपराव (४०, रा. रायगड) याला येथील पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेली २० किलो वजनाची २२१ वजनमापे पोलिसांनी हस्तगत केली. वजनमापे वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पोही जप्त केला आहे.
एमआयडीसीतील दीपक नोव्हाकेम कंपनीतून २० किलो वजनाची आणि २ लाख ४५ हजार रुपये किंमतीची वजनमापे चोरीस गेल्याची तक्रार एप्रिलमध्ये येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले तपास करत होते. पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी कंबर कसली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button