
मोठी बातमी! मुंबईत आज 5 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळणार
तीन देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे जगाला इंधन दर वाढ आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींची झळ बसत आहे. भारतातील इधंन दर हे दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मुंबईकरांना दिलासा देणारा उपक्रम हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील ३६ पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना ५ रुपये प्रति लिटर स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची माहिती देताना मनसेचे विभाग अध्यक्ष जय शृंगारपुरे आणि नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, सध्या देशात महागाईने उचललेल्या कळा आणि पेट्रोल-डिझेलचे आकाशाला गेलेले दर पाहता जनतेला काही प्रमाणात दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे.जय शृंगारपुरे म्हणाले, “आज जी परिस्थिती देशात आहे, महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आमच्या पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत.” संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “केंद्र सरकार भैर झाले आहे. त्यांना फक्त जनतेचा रेकॉर्ड मोडायचा आहे. आम्ही मुद्दे उपस्थित करतो तर ते म्हणतात तुमचे फक्त ७ नगरसेवक आहेत, आमचे १०० आहेत. पण सब्सिडी द्यायला हवी होती. डॉलर वाढत आहे, त्याचा परिणाम पेट्रोलच्या किंमतीवर होत आहे.”
मुंबईतील ३६ पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना ५ रुपये प्रति लिटर सवलत.
-फक्त दुचाकीस्वारांसाठी हा लाभ.
-राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.




