रत्नागिरी शहरात नगरपरिषदेची ’प्लास्टिकमुक्ती’ मोहीम परत सुरू


रत्नागिरी शहरातील सांडपाण्याची निचरा व्यवस्था सुरळीत राहावी आणि पावसाळ्यातील ’वॉटरलॉगिंग’ची समस्या टाळावी, यासाठी नगरपरिषदेने पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी गजबजलेल्या आठवडा बाजारात न.प.च्या आरोग्य पथकाने अचानक धडक कारवाई करत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नगरपरिषदेचे कामकाज नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली प्लास्टिकविरोधी मोहीम तात्पुस्ती स्थगित होती..
मात्र, आता प्रशासकीय कामकाज रुळावर येताच, न.प.ने पुन्हा कडक नियमांसह ही मोहीम कार्यान्वित केली आहे. यासाठी आरोग्य विभागाची दोन विशेष पथके शहरात तैनात करण्यात आली असून, ती सातत्याने फिरतीवर राहणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार, १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक शीट्स आणि थर्माकोलपासून बनवलेल्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करता ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत नगरपरिषदेने दिले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button