
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटकमुक्तसाठी निधीची तरतूद नाही
राज्यातील रेल्वे फाटकमुक्तीच्या ६५ महत्वाच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानी मंजुरी दिल्याची घोषणा सोमवारी होताच विकासाच्या गप्पांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र या घोषणेत चिपळूण तालुक्यातील कळबस्ते रेल्वे फाटकाचा उल्लेख नसल्याने स्थानिकांच्या नाराजीला पुन्हा एकदा वाट मोकळी झाली आहे. दिवसातून तब्बल ३० ते ३५ वेळा बंद राहाणारे हे फाटक आणि त्यावर अवलंबून असलेली पंधरागाव परिसराची जीवनवाहिनी आजही उड्डाणपुलाव्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव बदललेले नाही.www.konkantoday.com




