
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ जून रोजी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण समितीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
www.konkantoday.com




