धामणसे-सांबरेवाडी येथे रस्ता ओलांडणार्‍या चिमुकल्याला कारची धडक


रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणसे-सांबरेवाडी येथे रस्ता ओलांडत असलेल्या पाच वर्षीय बालकाला कुझर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर जखमी बालकाला मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत तुकाराम शंकर जाधव (वय ६३, रा. कराड, जि. सातारा) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी सुनिता जाधव या आपल्या पाच वर्षीय नातू रियांश राहुल जगदाळे याचा हात धरून रस्ता ओलांडत होत्या.
याचवेळी गणपतीपुळेच्या दिशेने येणार्‍या क्रुझर वाहनाने (एमएच-२०-डीजे-०८७६) भरधाव वेगात येत रियांशला जोरदार धडक दिली. या अपघातात चिमुकल्या रियांशला गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या. अपघात घडल्यानंतर चालकाने वाहन थांबवून जखमी बालकाला मदत करणे अपेक्षित असताना तो न थांबता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे हा प्रकार ’हिट अँड रन’चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button