वालावलकर रुग्णालयाच्या रक्तपेढीचा मुंबई येथे सन्मान

मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान स्विकारताना डॉ. सुनील नाडकर्णी, बी. टी. ओ डॉ. सुनीता झुंजारवाड आणि गिरीश गुरप यांनी हा सन्मान स्वीकारला.

चिपळूण, ता. ७ : श्री स्वामी समर्थ रक्तपेढी मुंबई येथील ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशन (दिवा) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मिरा रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाच्या समर्थ रक्तपेढीचा विशेष सन्मान करण्यात आला.

‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) डॉ. राजीव सिंग रघुवंशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांच्या वतीने डॉ. सुनील नाडकर्णी, बी. टी. ओ डॉ. सुनीता झुंजारवाड आणि गिरीश गुरप यांनी हा सन्मान स्वीकारला.

बी.के.एल. वालावलकर रुग्णालयाची रक्तपेढी सन २००० पासून कार्यरत असून, कोकणातील रुग्णांना सर्व प्रकारच्या रक्तघटकांची उपलब्धता करून देत सातत्याने महत्त्वपूर्ण सेवा बजावत आहे. या रक्तपेढीच्या कार्यात वरिष्ठ रक्तपेढी तज्ञ (Senior BTO) डॉ. सुनीता झुंजारवाड आणि रवी अग्रवाल यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामीण भागात असूनही रक्तपेढीमध्ये अत्याधुनिक सुविधा, आधुनिक उपकरणे, कडक गुणवत्ता नियंत्रण व व्यवस्थित आहेत. FDA मान्यताप्राप्त कर्मचारी नियमित प्रशिक्षण घेतात. स्वेच्छा रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित जनजागृती शिबिरे आयोजित केली जातात. संकलित रक्त शीतसाखळी (Cold Chain) पद्धतीने सुरक्षितपणे आणले जाते व त्वरित प्रक्रिया केली जाते.

दरवर्षी सुमारे ६,००० रक्तघटक प्रक्रिया केली जातात, २५ पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात आणि ३,००० पेक्षा अधिक अॅनिमिया रुग्णांना मदत केली जाते. रक्तपेढी सुमारे ३१५० चौ.फुट क्षेत्रात असून FDA च्या सर्व नियमांनुसार कार्यपद्धती राबवली जाते. सर्व SOPs तयार करून योग्य ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत.

स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी दिवसातून तीन वेळा १% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने साफसफाई केली जाते. रक्तदात्यांचा विभाग, प्रक्रिया प्रयोगशाळा व घटक प्रयोगशाळा स्वतंत्र आहेत.

वैद्यकीय नेतृत्व डॉ. सौ. सुनीता माधव झुंजारवाड या रक्त संक्रमण सेवेत ४१ वर्षांहून अधिक अनुभवी आहेत. त्यांनी PG चंदीगड येथे डॉ. जे. जी. जॉली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. तसेच डॉ. झरीन भरुचा व American Red Cross (MSAC) कडूनही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या अनुभवामुळे रक्तपेढीची प्रगती योग्य दिशेने झाली आहे.
कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. आम्ही EQAS मध्ये नोंदणीकृत असून गुणवत्ता तपासणीत उत्तम कामगिरी करत आहोत.

रक्त व रक्तघटकांची मागणी जास्त असल्यामुळे आम्ही नियमित रक्तदान शिबिरांद्वारे संकलन करतो. सर्व रक्तगट व घटक नेहमी उपलब्ध ठेवले जातात, त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळता येते.

ह्या वैशिष्टामुळेच ड्रग्ज इन्स्पेक्टर्स वेल्फेअर असोसिएशने संपूर्ण महाराष्ट्रातून डेरवण येथील स्वामी समर्थ रक्तपेढीचा सन्मान केला आहे.

सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या हिरव्यागार वालावलकर रुग्णालयाच्या परिसरात ही रक्तपेढी कार्यरत असून गेल्या २६ वर्षांपासून संपूर्ण कोकण भागात अखंड सेवा देत आहे. सन २०१२ साली झालेल्या लेप्टोस्पायरोसिस आणि त्यानंतरच्या डेंग्यू साथीच्या काळात प्लेटलेट्स कमी झालेल्या (थ्रोम्बोसाइटोपेनिया) रुग्णांसाठी ही रक्तपेढी एकमेव आधार ठरली होती. दरवर्षी प्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तस्रावामुळे त्रस्त असलेल्या शेकडो मातांचे आणि अपघात ग्रस्त रुगणाचे प्राण वाचविण्यास ही रक्तपेढी सक्षम ठरली आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या आउटरीच केंद्र म्हणून ही रक्तपेढी केमोथेरपीमुळे बोन मॅरो वर परिणाम झालेल्या कर्करोग रुग्णांना मोठा आधार देते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत किंवा संस्थेमार्फत रक्त प्रायोजित केले जाते. “रक्त हे प्रत्येक गरजू रुग्णासाठी जीवनदायी उपचार आहे” या तत्त्वावर पेढी कार्य करते अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button