
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १५ अंमलदारांना पदोन्नती
रत्नागिरी : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस दलातील १५ अंमलदारांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर अंमलदार स्नेहल पेढांमकर, विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे व स्वप्नील तळेकर यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच पोलीस हवालदार पदावर अंमलदार दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी, राजेंद्र नलावडे यांना पदोन्नती देण्यात आली.
या कार्यक्रमास पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.




