
दापोली-खेड मार्गावर कार उलटून अपघात; पाच जण किरकोळ जखमी
दापोली-खेड मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले. या अपघातात कारमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (३ जून) पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच ४६ सीएच ६०५६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची वॅगनआर कार खेडहून दापोलीकडे येत असताना टाळसुरे येथील खोतवाडी व ग्रामपंचायत परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यावर उलटून अपघात झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील पाचही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.




