गर्भवतीला रुग्णवाहिका नारणार्‍या दोघांना नोटीस, दोषी ठरल्यास कारवाई होणार


दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे गर्भवती महिलेला वेळेत १०२ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याच्या गंभीर प्रकारानंतर आरोग्य विभागाने संबंधित दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले असून संबंधित लिपिक आणि वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास लिपिकाची बदली, वेतनवाढ रोखणे तसेच कंत्राटी वाहनचालकाची सेवा समाप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वंजारी यांनी बोलताना दिली.
आंजर्लेतील हा प्रकार शनिवारी घडला. तालुक्यातील देहण येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या घटकातील एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची गरज होती. मात्र आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाने ’डिझेल नसल्यामुळे गाडी जाऊ शकत नाही असे सांगत सेवा देण्यास नकार दिला. यामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी भागवत यांच्या पुढाकारातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि महिलेला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वेळेत उपचार मिळाल्याने माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button