दापोली तालुक्यातील मुरुड येथे ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू


दापोली तालुक्यातील मुरुड येथील तांबडीचा कोंड परिसरातील विराज मधुसूदन तुपे (४०) या तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज तुपे हे मुरुड येथील हॉटेल वसंत विहारसमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका बंद गॅरेजच्या शेडमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे वडील मधुसूदन रामचंद्र तुपे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती विराज तुपे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मधुसूदन तुपे यांनी दापोली पोलीस स्थानकात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button