दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन


संगीत क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. आज (31 मे 2026) रोजी मुंबईतील राहत्या घरी सुमनताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या.त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. यात मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली भाषेतील गाण्याचा समावेश आहे. त्यांची अनेक गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.

28 जानेवारी 1937 रोजी जन्म

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारताच्या (आताचा बांग्लादेश) भवानीपूर येथे झाला होता. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले. त्यांनी लग्नापूर्वीही अनेक गाणी गायली.

अनेक पुरस्कारांनी गौरव

सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. गझल, ठुमरी, भक्तिगीते हे त्यांचे आवडीचे गायन प्रकार होते. नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार, भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार यांच्यासह वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

प्रसिद्ध मराठी गाणी

सुमन कल्याणपूर यांची लोकप्रिय मराठी गाणी म्हणजे ‘रिमझिम झरते श्रावण धारा’, ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केशवा माधवा’, ‘ओमकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘या लाडक्या मुलानो’, ‘आई सारखे दैवत सार्‍या जगतात नाही’,’केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणु’, ‘अरे संसार संसार’, ‘असावे घर ते आपुले छान’, ‘आकाश पांघरून जग शांत झोपलेले’,’नाविका रे वार वाहे रे’, ‘या कळ्यांनो या फुलांनो’ (मंत्र वंदे मातरम), ‘कशी करू स्वागता’, ‘तुझ्या कांतीसम’. तसेच त्यांनी मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद, हेमंतकुमार अशी विविध गायकांसोबतही अनेक गाणी गायली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button