
गुहागर तालुक्यातील मळण येथे घराचे बांधकाम करत असताना भिंतीवरून तोल जाऊन पडून युवकाचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील मळण येथील दिलीप आगरे यांच्या नवीन घराचे बांधकामाचे काम सुरु असताना ३४ वर्षीय तरुणाचे पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
नरेश पाष्टे वय (वर्षे ३४), राहाणार खामशेत पाष्टेवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे. नरेश हा पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल गेला आणि तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वाहळामध्ये पडला. त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ शृंगारतळी येतील डॉ. ओक यांच्या दवाखान्यामध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मयत म्हणून घोषित केले.
www.konkantoday.com




