स्थानिकांसाठी वेगळी रांग करण्यावरुन खेडमध्ये सीएनजी पंपावर रांगेवरून गोंधळ
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील एका गॅसच्या सीएनजी पंपावर रांगेवरून स्थानिक वाहनचालक व अन्य वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले. स्थानिक रांगेवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असला तरी स्थानिक वाहनचालकांना रांगेतच उभे राहावे लागत आहे. याचमुळे वादाचे प्रसंग उदभवत आहेत.
सीएनजी पंपावर स्थानिकांसाठी स्वतंत्र रांग उपलब्ध करून देण्याची स्थानिक वाहनचालकांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे तक्रार केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री कदम यांनी स्थानिक वाहनचालकांसाठी सीएनजी पंपावर स्वतंत्र रांग सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार स्थानिक वाहन चालकांना स्वतंत्र रांगेत मिळणार्या सीएनजी गॅसमुळे मोठी गैरसोय दूर झाली होती.
मात्र सुरुवातीचे दोन दिवस वगळता स्वतंत्र रांगेवरून सीएनजी पंपावर गोंधळ उडत आहे. स्थानिक वाहनचालक स भरण्यासाठी स्वतंत्र रांगेत उभे राहिल्यानंतर अन्य वाहनचालक आक्षेप घेत वांद घालत असल्याने गोंधळ उडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आलेली स्वतंत्र रांग बंद करण्यात आल्याने स्थानिकांनी हंगामा केला.www.konkantoday.com




