अख्तर दलवाई यांच्या निरांजन हे तेवत राहो या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित


महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य यादीसाठी निवडलेल्या अख्तर दलवाई लिखित निरांजन हे तेवत राहो कादंवरीची नुकतीच दुसरी आवृत्ती पुणे येथील पार्थ प्रकाशनाच्या मार्फत प्रकाशित झाली आहे. सन २०२१ व २०२२ मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून अॅक्टोबर २०२३ च्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीच्या बैठकीत समितीने निवड केलेल्या ग्रंथांची यादी उत्तम, दर्जेदार व वाचनमूल्ये अधिक असलेली असावी, याकरिता काही निकष ठरविण्यात आले. त्या निकषांच्या आधारे समितीने शिफारस केलेली यादी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली. याच शासनमान्य ग्रंथांच्या यादीत दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या प्रथमावृत्तीचा समावेश करण्यात आला. नुकतीच प्रकाशित झालेली दुसरी आवृत्ती महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत पोहोचवणे हे प्रकाशकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button