
माहितीच्या अभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वसतिगृहांच्या ३०७ जागा रिक्त
रत्नागिरी जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतिगृहांची सद्यस्थिती पाहता प्रशासकीय अनास्था आणि माहितीच्या अभावामुळे आजही शेकडो जागा रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण ८५० मंजूर विद्यार्थी क्षमतेपैकी केवळ ५४३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला असून, तब्बल ३०७ जागा अजूनही रिकाम्या पडून आहेत.
यात सर्वात गंभीर बाब म्हणजे चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची इमारत जीर्ण झाल्याने येथील कामकाज पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे येथील ७५ च्या ७५ जागा पूर्णपणे रिक्त आहेत.
www.konkantoday.com




