रत्नागिरीतील ती गॅस शवदाहिनी तात्पुरती बंद करण्याचा नगर परिषदेच्या निर्णय


रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत शिवाजीनगर, चर्मालय स्टॉप, मजगांव रोड येथील स्मशानभूमीत प्रेतांचे दहन करण्यासाठी बसविण्यात आलेली गॅस शवदाहिनी दि. २७ मे २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी या शवदाहिनी मध्ये सात तास मृतदेह अडकल्याची घटना घडली होती त्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेने आवाज उठवला होता

याबाबत जनतेच्या माहितीसाठी रत्नागिरी नगर परिषदेने एक प्रेस नोट प्रसिद्ध केले आहे , गॅस शवदाहिनीमध्ये आवश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी आणि पर्यायी व्यवस्था वापरावी, असे आवाहन मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button