सामाईक जागेतील झाडाचे आंबे काढण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत, तिघे जखमी


सामाईक जागेतील झाडाचे आंबे काढण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील नायरी बाैद्धवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी संगमेश्वर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, िफर्यादी श्रावणी रंजित पवार (32) आणि संशयित आराेपी यांची घरालगत सामाईक जागा आहे. या जागेत आंब्याची दाेन कलमी झाडे आहेत. 22 मे राेजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संशयित आराेपींमधील एका 16 वर्षीय मुलाने या झाडावरील आंबे काढले. यावर िफर्यादीचे ’पती रंजित पवार यांनी, सामाईक झाडावरील आंबे तुम्ही एकटेच येऊन काढून घेता, हे काय तुमचे एकट्याचे झाड आहे काय? असा जाब विचारला. या गाेष्टीचा राग मनात धरून संशयितांनी एकत्र येत िफर्यादी, त्यांचे पती आणि मुलीला लाथाबुक्क्यांनी काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत श्रावणी रंजित पवार, रंजित जयराम पवार आणि आस्था रंजित पवार हे तिघेही जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पाेलिसांनी अंकुश जयराम पवार, अमिता अंकुश पवार, मंगेश सीताराम पवार (45), माया जयराम पवार 75), मंगेश पवार यांचा 22 वर्षीय मुलगा (नाव माहीत नाही) या संशयितां विराेधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पाेलीस करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button