
आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द
*रत्नागिरी, जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.१ जून रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात होणार होता. तथापि, महाराष्ट्र विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम दिनांक १८ मे पासून घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक १८ मे पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच दिनांक २५ जून पर्यंत जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.



