श्रावणी मालगुंडकर हिने मेकअप आर्टिस्ट कोर्समध्ये मिळविले उच्चश्रेणी सुयश!

  • “कांचन डिजिटल”मध्ये श्रावणीने रोवला मानाचा तुरा
  • नवी मुंबईतील शासन पुरस्कृत “प्रगती मेकअप स्टुडिओ”त केला कोर्स
  • सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रगती बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणीने मिळविले यश

रत्नागिरी ( प्रतिनिधी )- रत्नागिरीचे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांची कन्या श्रावणी मालगुंडकर हिने नवी मुंबईतील नामांकित “प्रगती मेकअप स्टुडिओ”च्या मेकअप आर्टिस्ट कोर्समध्ये उच्च श्रेणी प्राप्त करत सुयश मिळविले आहे. यामुळे कांचन डिजिटलमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल श्रावणीचे विशेष कौतुक होत आहे.

नवी मुंबईतील “प्रगती मेकअप स्टुडिओ” ही संस्था शासन पुरस्कृत “अखिल भारतीय व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण परिषद” अंतर्गत आणि “इंटरनॅशनल डिप्लोमा सर्टिफाईड” आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर प्रगती यांनी श्रावणीला शासनमान्य प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी श्रावणीचे व तिने मेकअपमधील विविध स्पेशालायझेशनचे तोंडभरून कौतुक केले.

श्रावणीने या कोर्स “रॉयल मेकअप आर्टिस्ट, फुल एचडी मेकअप, स्पेशल एअर ब्रश मेकअप, डूयू मेकअप, डस्किकी स्किन मेकअप, पिगमेंटेड अँड विटिलिगो स्किन मेकअप, ट्रॅडिशनल अँड इंडो वेस्टर्न बन, ट्रॅडिशनल अँड इंडो वेस्टर्न कल्स, विथ युज ऑफ हेअर एक्सटेन्शन, ऑल टाइप्स ऑफ हेअर स्टाईल विल प्रोव्हाइडेड, महाराष्ट्रीयन लुक, वेडिंग लूक, वलीमा लुक, मेहंदी लुक, हळदी लोक, मॅच्युअर स्किन मेकअप, वेस्टर्न पार्टी लुक, इंटरनॅशनल प्रोडक्स आर, युज लाईक नार्स, क्यूटी ब्युटी, मॅकेज मिया, रिकोड, शॉप रेल” आदी विविध मेकअप करण्यात महारथ मिळवली आहे.

श्रावणीच्या मेकअपमधील यशामुळे “कांचन डिजिटल” आता परिपूर्ण झाले आहे. मुलीने मिळविलेल्या या यशाबद्दल मला अत्यंत आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने दिली. श्रावणीने आता रत्नागिरीमध्ये मेकअप ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. लग्न व इतर विविध मंगलकार्यप्रसंगी कांचन डिजिटलकडे ( 7558346909 ) आवश्य संपर्क साधावा, असे आवाहन श्रावणी मालगुंडकर हिने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button