आडीवरे परिसरात वृद्धाची सोन्याची चैन हिसकावून चोरटा पसार; पोलिसांकडून तपासाला वेग


राजापूर तालुक्यातील आडीवरे-वैत्ये मार्गालगतच्या रान परिसरात एका वृद्ध व्यक्तीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून अज्ञात दुचाकीस्वार फरार झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध इसम रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक सूचना देत आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button