नातूनगरच्या पाण्यावर १५० हे. क्षेत्र लागवडीखाली


नातूनगर धरणातील पाण्यावर नजिकच्या ग्रामस्थांसह शहरवासियांची तहान शमवली जात आहे. याच धरणातील पाणी उन्हाळ्यातही शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे २५हून अधिक शेतकरी दुबार पिके घेत आहेत. २०५० हेक्टर क्षेत्र जलसिंचन करण्याची धरणाची क्षमता आहे. आतापर्यंत धरणाच्या पाण्यावर १५० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नातूनगर धरण शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. या प्रकल्पांतर्गत दोन प्रमुख कालवे असून दोन्ही कालव्यांमधून शेतीसह बागायतीसाठी पाणी सोडले जाते. डिसेंबरनंतर धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात असल्याने दुबार पिके घेण्याकरिता नातूवाडी प्रशासनाकडून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध केले जाते. या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती पाठोपाठ अन्य पिकांचीही लागवड केली जाते. भातशेतीसह शेतकर्‍यांनी आता भुईमूग लागवडीचाही पर्याय निवडला आहे.
नातूनगर, बोरघर, खवटी, उधळे, वावे, भडगाव, कळंबणी, आपेडे, चाकाळे, भरणे, मुरडे, आंबये, जामगे, शिवतर, खोंडे आदी गावांसाठी कालव्यातून पाणी सोडून शेतकर्‍यांना उपलब्ध केले जाते. या पाण्यावर शेतकरी दुबार भातशेतीसह कडधान्याची शेती करत आर्थिक प्रगती साधत आहेत. मातशेतीला पर्याय म्हणून शेतकर्‍यांनी भुईमूग लागवडीचाही पर्याय निवडल्याने आर्थिक सुबत्ता निर्माण होण्यास मदत होत आहे. यामुळे आतापर्यंत २५ गावातील १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button